मलकापूर विधानसभा मतदारसंघा अंतर्गत मलकापूर नांदुरा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे मोदी आवास घरकुल योजनेचे हप्ते थांबलेले असल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लाभार्थ्यांच्या घरकुलांचे हप्ते तात्काळ जमा करण्याबाबत निवेदनाद्वारे दिनांक 07/09/2024 रोजी मागणी केली होती.
ह्याबाबत सविस्तर वृत्त असे की , बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी १७०५५ एवढे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार १७०५५ लाभार्थ्यांना मंजूरात प्रदान करण्यात आली असून यापैकी १९३५ घरकुले पूर्ण झाली असून १५१२० घरकुले निधी अभावी अपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे मलकापूर मतदार संघातील मलकापूरला ११९५ व नांदुरा ला १३६२ असे एकूण २५५७ चे उद्दीष्ट प्राप्त झाले. त्यापैकी मलकापूर व नांदुरा मिळून ९३५ घरकुले पुर्णत्वास आले असून १६२२ घरकुले निधी अभावी अपूर्ण आहे. त्यांना नगदी स्वरुपात मिळणाऱ्या रु. १,२०,००० (रु. एक लक्ष वीस हजार) पैकी १५,००० रुपये एवढीच रक्कम आतापर्यंत सर्व घरकुल लाभार्थ्यांना मिळालेली असून उर्वरीत रक्कम गत ६ महिन्यांपासून मिळालेली नाही. त्यामुळे सदर घरकुल धारकांचा या संसार उघड्यावर पडला होता ही बाब हेरत मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत सन २०२३-२४ मधील मलकापूर मतदार संघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यातील लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्वरीत देण्यात यावे असे निवेदन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे विधानसभा प्रमुख चैनसुख संचेती यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते त्याची तात्काळ दखल घेत प्राप्त लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणेला आदेश निर्गमित केले होते त्यानुसार आज दि. 10 ऑक्टोबर पासून सदर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. हे मात्र नक्की.
