मलकापूर.आज दि.९ ऑक्टोंबर रोजी मा. प्रशासक साहेब तथा तहसीलदार साहेब यांना संविधान आर्मीच्या वतीने भिवा भाऊ चोपडे विदर्भा अध्यक्ष यांच्या नेतृत्वातनिवेदन देण्यात आले.
By -
अक्टूबर 09, 2024
0
निवेदनात नमूद आहे की मलकापूर शहरामध्ये विकास कामे करण्यासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी करोडो रुपये निधी प्राप्त होतो. त्या निधीमधून शहरातील प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी कामे झालेली व सुरू आहे . त्यापैकी बरीशी कामे कागदपत्री करण्यात आलेली आहे. त्यातच न.प. फंडातून सुद्धा अनेक कामे कागदोपत्री करण्यात आलेली आहेत. या सर्व झालेल्या व सुरू असलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच दोशी व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. तोपर्यंत न.प. फंडातून पुढील कामांना मंजुरात देण्यात येऊ नये. निकृष्ट दर्जाच्या कामाची व झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून न झाल्यास संविधान आर्मीच्यावतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आलेला आहे.
