वर्षावास व बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ समाप्ती निमित्त इंदिरानगर दाताळा येथे, दिनांक 17 /10 रोज गुरुवार रोजी, खीर दानाचा आणि आरोग्य शिबिर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
सविस्तर असे की, कर्मकांडापासून मुक्त होऊन तथागत गौतम बुद्धांचा मार्ग विज्ञानाच्या युगाकडे जाणारा आहे त्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथाकथाचा मार्ग आम्हास दिला त्याच अनुषंगाने गेले सहा महिने बुद्ध आणि ज्यांचा धम्माच वाचन दाताळा येथील रमेश झनक, विकी अहिरे, महेंद्र खराटे यांनी अनुयायांसोबत  रोज बुद्धांच्या धम्माचा पठण केले, त्याच अनुषंगाने आज रोजी मोठ्या थाटात सर्व दाताळा वाशियांच्या सोबतीने , आणि भंते महेंद्र यांच्या उपस्थितीत,कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमाचे उद्घाटक मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे साहेब यांची  उपस्थितीत आरोग्य  शिबिराचे आयोजन संजय भाऊ दाभाडे , रक्तदाता प्रतिष्ठान संघर्ष ग्रुप महाराष्ट्र चे अपरेश राजे तुपकरी यांनी केले होते, या शिबिरामध्ये मलकापूर येथील  नामांकित डॉक्टर अनुप धोरण, मयुरी धोरण, डॉक्टर पवन रघुनाथ पाटील, डॉक्टर स्मिता पाटील, डॉक्टर प्रतिक गुरचळ, मनीषा पाटील, डॉक्टर प्रणव चोपडे, संजय तायडे यांचे सह अनेक डॉक्टर इंदिरानगर येथे येऊन आरोग्य शिबीर सहभाग घेतला. या शिबिरामध्ये दाताळ्यातील असंख्य रुग्णांनी सहभाग नोंदविला, सदरच्या कार्यक्रमांमध्ये माजी सरपंच हरिभाऊ देशमुख, पंचायत समिती माझी उपाध्यक्ष आनंदा शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार विलास भाऊ खर्चे, संतोष भाऊ राजपूत, बाप्पू देशमुख, राऊत काका यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मंडळी सदर कार्यक्रमाला हजर होती. गेले सहा महिने इंदिरानगर तील सर्व संघर्ष मित्र मंडळातील तरुण युवक तथा गावकरी मोठ्या उत्साहाने ग्रंथाचे वाचन करीत होते, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भाऊ दाभाडे यांनी केले असून या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता भाऊराव दांडगे, शिवाजी गवई, आनंदा ब्राह्मणे, सागर सपकाळ, सुधाकर खंडेराव त्यांचे सह गावातील असंख्य उपासकांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता मेहनत घेतली

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)