धा.बढे येथे गजानन नगरीत श्री संत गजानन महाराज मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व भव्य महाप्रसादाचे आयोजन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

धा.बढे येथिल भैरवनाथ बहुउद्देशीय भजनी मंडळाचे वतीने आयोजित विदर्भातील प्रती पंढरी शेगावीचा राणा श्री.संत गजानन महाराज यांच्या भव्य दीव्य मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने परिसरातील हजारो भक्तगण या सोहळ्यात सहभागी होवुन भक्तीरसात मग्न झाले
प्रथम सुशोभित बैलगाडीवरुन श्री संत गजानन महाराजांची मनमोहक शुभ्र संगमरवरी पाषाणाची भव्य दीव्य मुर्तीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली या प्रसंगी टाळ मृदंगाच्या गजरात जय गजानन जय गजानन सह गंण गंण गणात बोते या जयघोषाने परिसर दणाणुन निघाला महीला पुरुष बाल गोपाल या भक्ती रसात मंत्र मुग्ध झाल्या संपुर्ण गावातुन नगरप्रदक्षणा काढुन हजारो भक्तांच्या समवेत गजानन नगरीतील मंदीरात श्रीच्या मुर्तीची दुग्ध अभिषेक करुन पुरोहीतांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करुन स्थापीत केली 
श्री च्या स्थापने नंतर दुसरे दीवशी महाप्रसादाचे आयोजन केले या प्रसंगी श्री गजानन महाराजांचे सेवाधारी महीला पुरुष भक्तांनी नियोजन बध्द व शिस्तबद्ध शांतता पुर्वक हजारो उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ दीला शेकडोच्या संख्येत महीला पुरुष सेवाधारी म्हणुन आप आपले कार्य पार पाडीत होते  
एव्हढ्या मोठ्या प्रमाणातील महाप्रसाद सोहळ्याला परिसरातुन हजारो गजानन भक्तांनी आपली हजेरी लावली
शिस्त,शांतता व स्वच्छतेचे भान राखुन कार्य पार पाडल्याने आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)