प्रेषित हजरत मोहम्मंद पैगबर यांच्या बद्दल अपशब्द वापरुन मुस्लिम समाजाची भावना दुखवणारे यती नरसिंहानंद यांच्यावर सामाजिक विरोधी प्रतिबंध कायद्याच्या कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करा सकल मुस्लिम समाज मुक्ताईनगर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)सकल मुस्लिम समाज मुक्ताईनगर यांनी मा.राष्ट्रपती भारत सरकार यांना तहसीलदार मार्फत निवेदन द्वारे मागणी केली की, यति नरसिंहानंद यांनी प्रेषित हजरत मोहम्मंद (स.) यांचा असहनीय आणि लज्जास्पद शब्द वापरुन अपमान केला आहे.आणि भारतासह जगभरातील मुस्लिमांच्या धार्मिक भावनां दुखवले गेले आहे. तसेच अशी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य मुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका असल्याचे म्हटले आणि तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आम्हीने केली आहे.तसेच देशाच्या विविध स्तरातील लोकांचे मौन आणि अटक न होणे यामुळेच संपूर्ण जगात देशाची प्रतिमा मलिन होत आहे.सरकार चे मौनावरून असे दिसून येते की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर 
राजकीय पाठबळ आहे. आणि कारवाईच्या अभावामुळे कायद्याचे हात आपल्या मानेपर्यंत पोहोचू शकत नाहीत,असा विश्वास दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांचा झाला आहे.कारण त्यांचे समर्थक सत्तेत आहेत.तरी आम्ही पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो की, अंतिम प्रेषितांचा अवमान करणाऱ्याला तात्काळ अटक करून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरुन भविष्यात पुन्हा असे कृत्य कोणी करू नये आणि यती नरसिंहानंद यांच्या विरोधात तक्रार दाखल करणे पुरेसे नाही तर त्याला कठोर तरतुदीनुसार अटक करणे आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे की सरकार हे अत्यंत दुःखद प्रकरण समजून घेईल आणि त्या दुर्दैवी व्यक्तीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देऊन तुरुंगात पाठवेल जेणेकरून जगभरातील लोकांना भारताच्या लोकशाहीचे कौतुक वाटेल.सदर निवेदन देते वेळी मुस्लिम मनियार बिरादरी चे जिल्हाउपाध्यक्ष हकिम आर चौधरी,शकील खाटीक सर,अफसर खान,शकुर जमादार,कलीम मनियार, रिजवान चौधरी,समद खाटीक,बशीर काजी,अहमद ठेकेदार, हाजी लाल खाॅ,हाशम शाह,जमील बेपारी,खालील खाटीक,शकील मेकॅनिकल, अन्नु शेख,अदि समाज बांधव उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)