प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
*बेलाड मध्ये पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घेण्यात आला या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 6 वाजेपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते.*
*ठिकाण:- छत्रपती संभाजी राजे नगर बेलाड पूर्व बस स्टॅन्ड येथून मार्गक्रमणाला सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील चौक येथून गावातील मुख्य रस्त्यातून मार्ग क्रमण करीत छत्रपती संभाजी राजे नगर बेलाड पूर्व येथील मुख्य रस्त्यावर मार्ग क्रमण करण्यात आले
*ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत*
बुधवार दि. 14 - 05-2025 ला बेलाड येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या मध्ये जिजाऊ वंदना आणी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवदंना देऊन मिरवणूकीला सुरवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे यांच्या संकल्प नेतून छत्रपती संभाजी राजे नगर येथून
बेलाड शाखा अध्यक्ष गजानन संबारे यांच्या नेतृवात छत्रपती संभाजी महाराज जयंती काढण्यात आली या वेळी संभाजी ब्रिगेड ची भगवी पताका व जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
च्या जय घोषाने बेलाड नागरी दुमदूमली व नागरिकांना मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पसरला, या वेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे, बेलाड शाखा अध्यक्ष गजानन संबारे, तालुका कार्याध्यक्ष पवन संबारे, तालुका प्रसिद्धी प्रमुख दिपक निंबोळकर, माधव रत्नपारखी, शाखा उपाध्यक्ष सुदामा साठे, प्रमोद पाटील,राम संबारे,अभिषेक संबारे, गणेश सोनोने, अभिषेक संबारे, ऋषीं संबारे, संजय डांबरे, गणेश संबारे,बळीराम संबारे, रोशन संबारे, यासह समस्त गावकरी उपस्थित होते
