धामणगाव बढे
गावातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारीला कायमचा आळा घालण्याच्या उद्देशाने, धामणगाव बढे येथे महत्त्वाच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावातील व्यापारी बांधवांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी 'सुरक्षा प्रकल्प' यशस्वी केला आहे.
या सुरक्षा प्रणालीमुळे गावात आता सीसीटीव्हीचे 'सुरक्षा कवच' तयार झाले असून, यामुळे गुन्हेगारीवर वचक बसण्यास मोठी मदत होणार आहे. चोरी, मारामारी किंवा इतर कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना यामुळे बळ मिळणार आहे, परिणामी गावाची सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल.
सामाजिक बांधिलकीचा आदर्श!
हा सुरक्षा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी गावातील सर्व व्यापारी मंडळींनी अत्यंत स्तुत्य पुढाकार घेतला. त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षिततेप्रतीची जागरूकता खरोखरच कौतुकास्पद आहे. या व्यापारी बांधवांनी गोळा केलेल्या वर्गणीनंतर, धामणगाव बढे चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री नागेशजी जायले सर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्याला ठाणेदार श्री नागेशजी जायले, श्री धनराज महाजन आणि श्री चंचल कुमार गोठी यांच्यासह धामणगाव बढेचे सरपंच श्री मोहन सपकाळ यांच्या हस्ते पार पडला.
व्यापारी संघटनेचे आभार!
गावाची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे, हे व्यापारी मंडळींनी कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या या एकजुटीच्या आणि सहकार्याच्या आदर्शामुळे धामणगाव बढेच्या सुरक्षिततेत एक नवा अध्याय जोडला गेला आहे.
या विशेष योगदानाबद्दल धामणगाव बढे येथील ग्रामस्थांनी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री केतन मोधे, उपाध्यक्ष श्री मुकुंदा शिरसागर, सचिव श्री एकनाथ किन्होळकर यांच्यासह सर्व सदस्य राहुल महाजन,अजिंक्य जाधव, श्री विष्णू घोंगडे, श्री शुभम बढे , हाफिस सादिक , गणेश घोंगडे, मुक्तार शाह फिरोज शहा आणि अजिज खाटीक सह सर्वे वयापारी संघटना चे सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
