शिवसेना (उबाठा) च्या डफडे बजाव आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक नरमले शेतकऱ्याला दिला एक लाख साठ हजार रुपयांचा विड्राल..

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

दवाखान्याच्या उपचारार्थ पैसे द्या अन्यथा बॅकेसमोर बुधवारी डफडे बजाव चा शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला होता इशारा 

मलकापुर:-तालुक्यातील वडोदा (पान्हेरा) येथील शेतकऱ्यांच्या भाच्याने वडिलांच्या दम्याच्या उपचारार्थ मामाच्या खात्यात पैसे पाठविले, मात्र मामाने पीक कर्ज काढलेले असल्याने ते पैसे पिककर्ज खात्यात जमा करण्याचे सांगून चार महिन्यापासून पैसे देण्यास बँक व्यवस्थापक टाळाटाळ करीत असल्याने बार्डर सुरक्षा फोर्स (बि.एस.एफ) जवानाच्या वडीलांचा उपचार रखडला असल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख (उबाठा) गजानन ठोसर यांनी दि. 08 ऑक्टोबर  25 रोजी  बॅकेसमोर डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने आज सकाळी 11 वाजता बॅक व्यवस्थापक नरमले असून त्यांनी हरीदास रामदास गायकवाड यांना एक लाख साठ हजार रुपयांचा विड्राल दिला आहे.
   तालुक्यातील वडोदा (पान्हेरा) येथील हरीदास रामदास गायकवाड यांची वडोदा येथे दोन एकर शेती असून त्या शेतीवर सन 22 - 23 मध्ये पन्नास हजार रुपये पिक कर्ज काढले होते,हरीदास गायकवाड यांच्या बचत खात्यावर बीएसएफ मध्ये पश्चिम बंगाल येथे कार्यरत असलेल्या भाचा अतुल वसंतराव कडू यांनी त्याच्या वडिलांच्या दम्याच्या उपचारांचा एक लाख 56 हजार रुपये पाठविले होते ते पैसे काढण्यासाठी हरीदास गायकवाड बँकेत केले असता बँक व्यवस्थापक कौशल वाडेकर यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करून सदरचे पैसे कर्ज खात्यात जमा करण्याचे फर्मान सोडले असून चार-पाच महिन्यापासून पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने वसंतराव कडू यांचा दम्याचा उपचार रखडला आहे. बचत खात्यात असलेले दीड लाख रुपये उपचारार्थ तात्काळ द्या अन्यथा बुधवार रोजी सकाळी 11 वाजता बॅक ऑफ महाराष्ट्र समोर डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला होता आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,हरीदास गायकवाड सह शिवसेना पदाधिकारी बॅकेत गेले असता बँक व्यवस्थापकाने शिवसेना पदाधिकाऱ्यांचे रौद्र रूप पाहत नरमाई भूमिका घेत गायकवाड यांचा एक लाख साठ हजार रुपयांचा चेक चा तात्काळ विड्राल दिला आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, विभाग प्रमुख सत्ताशाह, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, विश्वनाथ पुरकर,एजाज भाई, शेख मोहसीन शेख छोटू, मुस्ताक जमादार, मोहम्मद इकबाल, उखर्डा तांदूळकर, हरीदास शिंदे, हरिदास गायकवाड, हसन गौरी सह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

चौकट:-चार महिन्यापासून बॅक व्यवस्थापक कौशल वाडेकर पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता.. शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या डफडे बजाव आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने आज मला माझ्या खात्यातील एक लाख साठ हजार रुपयांचा विड्राल मिळाल्याने शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचे आभार मानले!

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)