अब्दुल मजीद सालार इक़रा उर्दू हायस्कूल, बोरनार येथे ‘आनंदाई शनिवार’चे आयोजन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


इक़रा एज्युकेशन सोसायटी संचलित अब्दुल मजीद सालार इक़रा उर्दू हायस्कूल, बोरनार येथे प्रभारी मुख्याध्यापक आरिफ़ मोहम्मद ख़ान सर यांच्या नेतृत्वाखाली आनंदाई शनिवार या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवीतील विद्यार्थी जजलान फारूक याच्या पवित्र कुरआन पठणाने झाली. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नात, गजल, इंग्रजी कविता, हजल (विनोदी कविता), तसेच मनोरंजक लतीफे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि आनंदात कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मजहर सर, फिरोज सर, जव्वाद सर, सादिक सर, आबिद सर, अमीर सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी आकिब सर, मुश्ताक भाई, युसूफ भाई आणि शब्बीर भाई यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन सर यांनी अत्यंत प्रभावी व रोचक पद्धतीने केले.

प्रभारी मुख्याध्यापक आरिफ़ मोहम्मद ख़ान सर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंदमय झाले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)