मलकापुर :- तालुक्यातील ग्राम विवरा येथे चार महिन्यापूर्वी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची शेती खरडून जाऊन पिकाचे नुकसान,घरातही पाणी घुसून जीवनावश्यक वस्तू सह अन्नधान्यांची संपूर्ण नासाडी झाली होती.16 सप्टेंबर रोजी अतीवृष्टी होवून तब्बल चार महिने उलटून सुद्धा अद्यापही मदत निधी न मिळाल्याने तहसील कार्यालय व बँक प्रशासनाकडे चकरा मारून थकलेल्या ग्रामस्थांनी याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख हरीदास गणबास यांना दिल्याने तहसील कार्यालयात पाल ठोकून झिंगे बोंबील भुजो आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या झिंगे बोंबील भुजो आंदोलनाच्या धास्तीने तहसील प्रशासनाने विवरा येथील ग्रामस्थांच्या बँक खात्यात तब्बल सहा लाख सात हजार रुपये जमा केल्याने ग्रामस्थांनी दि. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता विवरा गावात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार करीत फटाके फोडून डफडे वाजवून गावातून रॅली काढून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे,वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, रफिक भाई बर्तनवाले, हसन गौरी,सै..रहीम सै.करीम, शेख शब्बीर,शेख बब्बू,किसन वळसे,डिगांबर हिवाळे, कस्तुराबाई संबारे, हरी तळेकर, संजय तायडे, बाळकृष्ण चोपडे, सिताराम तायडे, सविता तायडे, योगेश भिल, लहू सोनवणे, अरुण सोनोने, शंकर सोनवणे, समाधान सोनवणे, रघुनाथ सोनोने,नथू नाफडे,किसन चोपडे, सुखदेव तायडे, संजय चोपडे,भावजी हिरळकर, नारायण चोपडे, किसन भोगे, बळीराम राणे, शंकर सोनवणे, गणपत डाके, लक्ष्मण चोपडे, निलेश चोपडे, मीना मोरे, दीपक तायडे, रवीकर तायडे ,शेषराव पाटील, मुकुंदा तायडे, नंदकिशोर चोपडे, पुष्पाबाई चोपडे ,शत्रुघ्न पारस्कर, समाधान तायडे, कविता राणे, भागवत कडू, मंगेश कोल्हे, गजानन सांगळकर, अरुण चोपडे, गजानन चोपडे, ज्ञानेश्वर कळमकर, विलास तायडे, वासुदेव सरोदे, सुधाकर फिरके, कमलाबाई शिंदे, विनोद सरोदे, सोपान भोगे, रवींद्र हिवाळे, जीवन कोल्हे, एकनाथ अटाळे, प्रभाकर बोरले, रामा चोपडे, एकनाथ सरोदे, मधुकर चौधरी, रघुनाथ चोपडे, रमेश चौधरी, रामचंद्र संबारे, सुनील बोरले, निर्मला पाटील, समाधान धांडे, बंडू भिरूड ,नीना नंडोकार, गुलाबराव तायडे, गंगाराम बोदडे, किसन चोपडे सह गावातील असंख्य ग्रामस्थ ची उपस्थिती होती.

