धामणगाव बढे
बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार पुजाताई संजयभाऊ गायकवाड यांची दणदणीत बहुमताने निवड झाल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. या विजयाचे पडसाद धामणगाव बढे येथे ही उमटले असून, येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
पुजाताई गायकवाड यांच्या विजयाची घोषणा होताच धामणगाव बढे येथील शिवसैनिकांनी एकत्र येत 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'शिवसेना जिंदाबाद'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भगवे ध्वज हाती घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा केला यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.
प्रमुख उपस्थितांची मांदियाळी
या विजयोत्सवात धामणगाव बढे येथील शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने सरपंचपति मोहन सपकाळ, भागवत दराखे, माजी सरपंच भोरे,श्रीकूष्ण भोरे, (शिवसेना शहर उपप्रमुख राजेश जाधव, रईस कुरैशी किशोर जाधव मोहमद कुरैशी सचिन सोनार, यांसह परिसरातील अनेक शिवसैनिक आणि नागरिक या जल्लोषात सहभागी झाले होते.
विकासाचा विजय
यावेळी बोलताना माजी सरपंच भागवत दराखे यांनी सांगितले की, हा विजय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि संजयभाऊ गायकवाड यांच्या विकासकामांवर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. पुजाताई गायकवाड यांच्या निवडीमुळे शहराच्या विकासाला आता अधिक गती मिळेल, असा विश्वासही
त्यांनी यावेळी व्यक्त केला

