लोणार येथे आज दिनांक 9 जानेवारी रोजी लोणार नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या सौ मीराताई भूषण मापारी यांच्या पदग्रहणाचा समारंभ

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


तसेच त्यांच्यासह निवडून आलेले नगरसेवक, नगरसेविका व इतरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा राहुलभाऊ बोंद्रे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मा लक्ष्मण दादा घुमरे उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी मा श्यामभाऊ उमाळकर सरचिटणीस प्रदेश काँग्रेस कमिटी मा कु. एड माधुरीताई पवार मा कांताभाऊ पाटील मापारी मा शांतीलाल गुगलीया मा भूषण मापारी मा साहेबराव पाटोळे मा केशवराव फुके मा शेख समद शहराध्यक्ष मा अश्रूबा फुके तालुकाध्यक्ष मा गजानन खरात इ पदाधिकऱ्यासह निवडून आलेले नगरसेवक नगरसेविका व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

       मा सौ मीराताई मापारी नगराधक्षा,नगरसेविका, नगरसेवक सर्वश्री मा आबेद खान मा अनिकेत मापारी मा गुलाबराव सरदार मा अ. उबेद अ. मुनाफ मा पंढरी चाटे मा साहेबराव पवार मा सौ सीमाताई नितीन शिंदे मा सौ हुमेरा सदब जामिल कुरेशी मा सौ नगमाबी जावेद कुरेशी मा सौ वर्षाताई संतोष मापारी मा सौ संध्याताई शामराव राऊत मा सौ वंदनाताई अरुण जावळे मा सौ पायल शुभम भगत मा सौ जुबेदा रमजान परसुवाले  यांचा सत्कार मा राहुलभाऊ बोंद्रे मा लक्ष्मण दादा घुमरे मा श्यामभाऊ उमाळकर  यांच्या हस्ते करण्यात आला.

        सत्कारला उत्तर देताना मा सौ मीराताई मापारी यांनी लोणार शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच शहरांमध्ये राहणारे झोपडपट्टीतील शेवटच्या  माणसापर्यंत गोरगरिबापर्यंत  विकास पोहोचण्याचे काम मी करणार असे सांगून सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व जनतेने निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. अत्यंत अभ्यासू , मार्मिक, सडेतोड असे त्यांचे भाषण झाले. त्यानंतर मा अड माधुरी पवार यांनी सुद्धा अत्यंत चांगलं वक्तव्य केल. सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा लक्ष्मण दादा घुमरे यांनी सुद्धा सर्व जनतेचे पदाधिकाऱ्याचे व कार्यकर्त्यांचे मीराताईंना प्रचंड बहुमताने निवडून आणल्याबद्दल आभार मानले. सौ मिराताई मापारी व भूषण मापारी यांनी रस्ते, पाणी, वीज, साफसफाई व इतर विकासाची कामे करून पर्यटनाच्या दृष्टीने लोणारचा विकास कसा साधता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत व विकास खेचून आणावा. जागतिक पातळीवर पर्यटन स्थळांच्या दिलेल्या विकासाच्या सुविधा लोणार मध्ये सुद्धा कशा विकसित होतील यासाठी प्रयत्न करावेत. देशातून व देशाबाहेरून आलेल्या पर्यटकांना येथे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असे सुद्धा त्यांनी सांगितले. मा शामभाऊ उमाळकर यांनी सुद्धा सर्वांचे आभार मानले व नगराध्यक्षांना नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. लोणार शहरातील या अगोदरचा काँग्रेसचा इतिहासाने सांगितला. अध्यक्षीय भाषणामध्ये मा राहुलभाऊ बोंद्रे यांनी लोणारच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलून येथे विकास जास्तीत जास्त करण्यासाठी नगराध्यक्ष  व सर्वांनी प्रयत्न करावे. सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या. नगराध्यक्षा नगरसेवक नगरसेविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या व जे उमेदवार पराभूत झाले असतील त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून आपल्या वार्डाचा आपल्या परिसरात काम करावे असे त्यांनी सांगितले.

       अत्यंत भव्यदिव्य अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा नितीन शिंदे यांनी केले व आभार सुद्धा त्यांनी मानले.त्यानंतर नगरपालिकेमध्ये जाऊन मा सौ मीराताई भूषण मापारी यांनी पदग्रहण केले. त्यावेळेला सर्व पदाधिकारी व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

       यावेळी प्रामुख्याने मा चिभडे मामा मा शैलेश बावस्कर मा वामनराव मोरे मा दौलत मानकर मा अशोक पोपळे मा सुभाष सोनुने मा वसीम कुरेशी मा रमजान मा एजाज खान मा भारत राठोड मा अन्नू सर मा विकास मोरे मा सतीश राठोड इ. पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)