प्रति शेगाव (घिर्णी )येथील शिवकालीन काळ्या उसाला राज्यसह परराज्यात मोठी मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



  💥शेतातील ऊस काढणीला वेग, मकर संक्रांतीला मोठी मागणी

 प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर

तालुक्यातील प्रति शेगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घिर्णी येथील शेतकरी पुरातन काळापासून शिवकालीन काळाऊची आपल्या शेतामध्ये पेरणी करतात व त्याला आजूबाजूच्या भागांमध्ये जाऊन विकतात परंतु आता ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे व मोठ्या शहरातील व्यापारी गावापर्यंत पोहोचल्यामुळे शेतकऱ्याचा काळा ऊस थेट मोठ्या शहरांमध्ये पोहोचवण्यास खूप मोठी मदत निर्माण झाल्या निसर्ग व सरकारच्या अनियमित कार्यक्षमते मुळे शेतकऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो परंतु या त्रासावर मात देत घिर्णी येथील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अनेक वर्षापासून कळ्या उसाची लागवड करतात व त्याची योग्य नियोजन करून त्यावर हजारो रुपये खर्च करून त्याला आपल्या शेतामध्ये जवळपास पंधरा ते सोळा फुटापर्यंत वाढवतात त्यामुळे वाढलेल्या कलरदार काळा रंगाच्या ऊसाला राज्यसह पर राज्यांमध्ये मोठी मागणी आहे .

    सोयाबीन कापूस, ज्वारी मका, इत्यादी पिकांच्या उत्पन्न कमी झाल्यामुळे व निसर्गामधील वातावरण बदलामुळे पिकांचे खूप मोठे नुकसान होते व शेतकऱ्याला मानसिक तसेच आर्थिक तान सहन करावा लागतो यामुळेच पर्याय म्हणून हजारो शेतकऱ्यांनी शिवकालीन काळ्या उसाची लागवड खूप मोठ्या संख्येने लावण्या सुरू केले आहे व त्यामुळेच गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.

मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील तसेच शेजारील राज्यांमध्ये ऊसाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून  गावातील शेतकऱ्यांकडून हजारो टन ऊस ट्रकच्या साह्याने पर राज्यात पाठवल्या जात आहे त्यामुळे शेतकऱ्याला आनंदाचे दिवस आले आहे रस्त्याच्या कडेला मोठे ट्रक कशासाठी उभे असतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे, शहरातील नागरिकांनी घिर्णी गावातील कळ्या ऊसाला ब्लॅक चंदनची उपमा दिल्यामुळे गावाची पुन्हा नवीन ओळख निर्माण झाली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)