शहिदांना अभिवादन करीत पत्रकार दिन साजरा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 मलकापूर : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व्हॉइस ऑफ मीडिया च्या मलकापूर शाखातर्फे शहरातील आज दि. ६ जानेवारी रोजी शहीद संजयसिंह राजपूत स्मारक येथे शहिदांना अभिवादन करीत तथा सेवानिवृत्त माजी सैनिक व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. 
     मलकापूर शहरातील पत्रकारांची संघटना व्हॉईस ऑफ मीडिया च्या माध्यमातून नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असतात. व त्यातूनच पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहरातील शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी नुकतेच भारतीय सैन्य दलातून सेवा निवृत्त झालेले सुभेदार दिनेश तायडे व पत्रकारिता क्षेत्रात स्वतः निवृत्ती घेतलेले जेष्ठ पत्रकार अनिलजी भाटी यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार अनिल भाटी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देशाची न्यायव्यवस्था बळकट करण्यामध्ये पत्रकारांचा महत्त्वाचा सहभाग असतो पत्रकारांनी समाजाभिमुख पत्रकारिता करावी असे प्रतिपादन केले. 
        कार्यक्रमाचे संचलन तालुकाध्यक्ष धीरज वैष्णव यांनी केले तर प्रास्ताविक वरिष्ठ पत्रकार हनुमान जगताप यांनी केले. याप्रसंगी संपादक वीरसिंहदादा राजपूत, पत्रकार गजानन ठोसर, नितीन पवार, धनश्रीताई काटीकर, कैलास काळे, प्रा. नितीन भुजबळ, शेख जमील पत्रकार, अशोक रावणकार, निखिल चीम, श्रीकृष्ण भगत, राजेश इंगळे, श्रीकृष्ण तायडे, दीपक इटणारे, प्रा. नितीन भोळे, योगेश धांडे, किशोर सोनवणे, ईश्वर खराटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)