राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचा इशारा l खामगाव प्रतिनिधी: खामगाव शहर हे तालुक्यातील सर्वात मोठे शहर आहे मात्र तहसील विभागातील रेशन कार्ड विभागाला मागील दोन वर्षापासून कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नसल्यामुळे रेशन कार्ड धारकांना विविध समस्याचे सामोरे जायला लागत आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी कायमस्वरूपी अधिकारी द्यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी दिला आहे. खामगाव तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाच्या चुकीमुळे जिल्ह्यातील अनेक राशन धारकांचे आरसी नंबर नाशिक विभागात ट्रान्सफर झाले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागत आहे. नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे लिखित अर्ज करून सुद्धा या समस्येचे योग्य समाधान केले जात नाही व नागरिकांना वारंवार आधार कार्ड, रेशन कार्ड यांची झेरॉक्स, दहा रुपयाची तिकीट लावून वेळोवेळी अर्ज करा असे सांगण्यात येत आहे. नागरिकांच्या या बिकट समस्येकडे मागील दोन वर्षात कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेऊन निकाली काढण्यात आली नाही. तसे पाहता सदर विभागाने जर नाशिक विभागाचे समन्वय राखून योग्य पत्र व्यवहार केला असता तर आतापर्यंत ही समस्या मार्गी लागली असती. शासन मस्त व नागरिक त्रस्त असे म्हणणे वावे ठरणार नाही.राष्ट्रीय ओबीसी महासंघावर च्या वतीने निवेदनात नमूद केले की ,बुलढाणा जिल्ह्यातील राशन धारकांचे आरसी नंबर नाशिक विभागात योग्य ते पत्र व्यवहार करून त्वरित बुलढाणा जिल्ह्यात हस्तांतरित करण्यात यावी. जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अन्नसुरक्षा निष्ठांक त्वरित वाढवण्यात यावा व लाभार्थ्यांना अन्नसुरक्षित समाविष्ट करून घेण्यात यावे.अपंग बांधवांना अंत्योदय योजनेचे कार्डचे वितरण करण्यात यावे.कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी असे न केल्यास पंधरा दिवसानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण, व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर उद्भवणाऱ्या संपूर्ण परिस्थितीला शासन व प्रशासन जबाबदार राहील असेही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी निवेदनात नमूद केले आहे.l याच्याप्रती 1 माननीय श्री छगन जी भुजबळ साहेब अन्नपुरवठा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई 2 माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 3 उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार महाराष्ट्र शासन मुंबई 4 उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र शासन मुंबई5 डॉ मा बबनरावजी तायडे साहेब राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष नागपूर 6 पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा 7 माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा 8मा मकरंद पाटील साहेब पालकमंत्री 9बुलढाणा अन्नपुरवठा पुरवठा निरीक्षक साहेब बुलढाणा 10माननीय एसडीओसाहेब खामगाव 11शहर पोलीस स्टेशन खामगावफोटो - गणेशभाऊ चौकसे

