२२ डिसेंबर २०२५ लोकशाहीवर घाव पत्रकारावर प्राणघातक हल्ला" अज्ञात तीन आरोपी विरोधात गुन्हे दाखल परंतु अध्याप"आरोपी मोकाट!

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 




संग्रामपूर | प्रतिनिधी

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर पुन्हा एकदा निर्घृण हल्ला झाला आहे.


२२ डिसेंबर २०२५ हा दिवस संग्रामपूर तालुक्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण लोकशाहीसाठी काळा दिवस ठरला.


 सत्य मांडण्याचे धाडस करणारे पत्रकार शेख कदीर यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. 


सुदैवाने ते बचावले, मात्र त्यांच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले असून आजही त्यांच्या जीवाला संबंधितांकडून धोका कायम आहे.



२२ जुलै २०२५ रोजी संग्रामपूर पुरवठा विभागातील कथित वरतूनकी, गैरव्यवहार व भ्रष्टाचार प्रकरणी पत्रकार शेख कदीर यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. 


ही तक्रार चौकशीसाठी पुढे गेल्यानंतर २२ डिसेंबर रोजी त्यांना तामगाव पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी दुपारी बोलावण्यात आले.



मात्र चौकशी साठी  संबंधित बीटमलदार थेट तहसील कार्यालयात गेल्याचे समोर आले आहे.


 यानंतर नेमके काय घडले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.?..


त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास, जंगल रस्त्याने येत असताना अज्ञात तीन इसमांनी पत्रकार शेख कदीर यांच्यावर अचानक हल्ला चढवला.


 डोक्यावर वार करण्यात आला असता मृत्यू अटळ होता, मात्र प्रसंगावधान राखून डोक्यावरचा घाव हातावर घेतल्याने त्यांच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले.

हल्लेखोर जंगल रस्त्यानेच फरार झाले. विशेष म्हणजे घटनास्थळी एकही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. 


दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



 पूर्वनियोजित कटकारस्थानाचा संशय

हा हल्ला अपघाती नसून पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 


जंगल रस्ता, सीसीटीव्हीचा अभाव, आरोपींचा माग काढण्यात अपयश—या सर्व बाबी तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह?निर्माण करतात.


घटनेनंतर पत्रकार शेख कदीर यांनी तात्काळ ऑनलाईन तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाखल केली. तसेच अमरावती येथील आयजी कार्यालयात सर्व कागदपत्रांसह लेखी तक्रार सादर करण्यात आली. 



पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी व तामगाव पोलीस स्टेशन यांना याची प्रत देण्यात आली. 


तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी तथा दैनिक सेवाशक्तीचे उपसंपादक व समाजसेवक शेख कदीर शेख दस्तगीर (वय 42) यांच्यावर अज्ञात तिघा इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी तामगांव पोलीस ठाण्यात 21 जानेवारी 2026 रोजी तोंडी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख कदीर हे पेपर जाहिरात प्रकरणी दिवसभर न्यायालयीन कामकाज आटोपून सायंकाळी सुमारे 6 वाजता संग्रामपूर येथून आपल्या दुचाकीने (एम.एच.-04 ई.ई.-1733) वरवट बकाल येथे जात असताना मधुकर बकाल यांच्या शेताजवळील हनुमान मंदिराजवळ तीन अज्ञात इसम विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आले.

त्यांनी “ओ पत्रकार” असे म्हणून हाक मारत शेख कदीर यांना थांबवले व पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस का पाठवले?.या कारणावरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.


 यावेळी एका इसमाने हातातील फावड्याने वार केला. हा वार चुकवताना तो शेख कदीर यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर व बोटावर लागून मुका मार झाला.

हल्ल्यानंतर आरडाओरड केल्यावर आरोपी घटनास्थळावरून पलायन झाले. दुखापत झाल्यानंतर शेख कदीर यांनी दुसऱ्या दिवशी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले असता त्यांना शेगांव येथील सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथे एक्स-रे व सीटी स्कॅन करून उपचार करण्यात आले.

या घटनेनंतर संबंधित अज्ञात इसमांकडून जीवितास धोका असल्याचे नमूद करत शेख कदीर यांनी तामगांव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 


पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू 


 अखेर अज्ञात तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचनामा व बयान नोंदविण्यात आले 

मात्र घटनेला अनेक आठवडे  उलटूनही हल्लेखोर अद्याप मोकाटच आहेत.

पत्रकारावर हल्ला  लोकशाहीवर हल्ला

आज पत्रकारावर हल्ला होतो, उद्या सत्यावर बंदी येते आणि परवा जनतेला प्रश्न विचारण्याचाही अधिकार उरत नाही. पत्रकाराच्या अंत्ययात्रा म्हणजे लोकशाहीच्या मृत्यूच्या मिरवणुका ठरत असल्याचे चित्र देशभरात दिसत आहे.

आजही शेख कदीर व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे.


 हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न नसून, समाजाच्या माहितीच्या हक्कावर झालेला हल्ला आहे.



लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर निर्भय पत्रकारिता!


जर पत्रकार सुरक्षित नसतील, तर संविधान केवळ कागदावर उरेल.

आज जर या हल्ल्याला न्याय मिळाला नाही, तर उद्या सत्य लिहिणारी शाई रक्तानेच लिहिली जाईल—हे कटू वास्तव नाकारता येणार नाही.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)