अब्दुल मजीद सालार इक़रा उर्दू हायस्कूल, बोरनारची बहुआयामी शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


इक़रा एज्युकेशन सोसायटी जळगांव संचलित अब्दुल मजीद सालार इक़रा उर्दू हायस्कूल, बोरनार येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत शाळेतील ८२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सहलीचा पहिला टप्पा चोपडा येथील साखर कारखाना येथे पार पडला. येथे विद्यार्थ्यांना ऊस गाळप प्रक्रिया, साखर निर्मितीचे विविध टप्पे, आधुनिक यंत्रसामग्री व व्यवस्थापन पद्धती यांची सविस्तर माहिती देण्यात आली. याच ठिकाणी शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी ताजेतवाने होऊन पाहणीचा आनंद घेतला.

यानंतर विद्यार्थ्यांनी शिरपूर येथील सूतगिरणी येथे भेट दिली. येथे कापसापासून सूत तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया, यंत्रांचे कार्य व गुणवत्ता नियंत्रणाबाबत माहिती माळी साहेब कडून देण्यात आली. याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जेवणानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक गीत गायनाच आनंद लुटला, ज्यामुळे सहलीचे वातावरण अधिकच उत्साही व प्रसन्न झाले.

पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांनी मिनी एअरपोर्ट ची पाहणी केली. येथे विमानतळाची रचना, धावपट्टीचे महत्त्व, सुरक्षितता व्यवस्था तसेच हवाई वाहतुकीची प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.

सहलीच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी शिरपूर येथे उद्यान येथे भेट देत विविध झोके, बोटिंग व मिनी ट्रेन चा आनंद घेतला. अभ्यासासोबतच मनोरंजनाची संधी मिळाल्याने विद्यार्थी अत्यंत आनंदी व उत्साही दिसून आले.

ही शैक्षणिक सहल प्रभारी मुख्याध्यापक आरिफ खान सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध व सुरक्षितरीत्या पार पडली. सहल प्रमुख म्हणून मजहर खान सर व फिरोज खान सर व जव्वाद अंजुम सर यांनी नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच शेख रोशन सर, शेख अमीर सर, युसुफ भाई व आपा यांनी सहलीदरम्यान मोलाचे सहकार्य केले. सहल यशस्वी साठी सादिक सर, आबीद सर, लिपिक आकिब सर व मुश्ताक भाई यांच्या सहकार्य लाभला. सहल यशस्वी झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार साहेब यांनी सांगितले की

ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध, आनंददायी व प्रेरणादायी ठरली असून प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस निश्चितच उपयुक्त ठरेल, व सर्वांचे अभिनंदन केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)