ऐतिहासिक परंपरेला उजाळा देत गुरूगोविंद सिंहजी यांच्या प्रकाश पर्व जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने येत्या १८ जानेवारी रोजी संगतवाडी गुरुद्वारा येथे विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये यश संपादित विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहन असे आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. स्पर्धे दरम्यान पंच म्हणून विषय विशेष तज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच याप्रसंगी गुरुद्वाराचे बाबा रविंदरसिंहजी, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार, आ. चैनसुख संचेती, रमेशसिंहदादा राजपूत, भाई अशांत वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्रकाश पर्वाच्या पार्श्वभूमीवर उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात भाविक, विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


