अवाजवी व आर्थिक पिळवणुक करणारी घरपट्टी कमी व रद्द करा* *नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची मागणीला तात्काळ सकारात्मक मान्यता

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 




मलकापूर:अवाजवी मालमत्ता कर आकारणीमुळे मलकापूर शहरातील मालमत्ता धारकांची खऱ्या अर्थाने आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी प्रत्येक प्रभागातील दोन जबाबदार युवा कार्यकर्त्यांनी समोर येऊन अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ अशी अनौपचारिक दबाव संघटना तयार करून जनतेच्या होणाऱ्या या पिळवणुकीला योग्य न्याय देण्यास यशस्वी ठरले आहे


घराची वयोमर्यादा, बांधकाम प्रकार(मातीचे,कच्चे, पक्के,डब्बरचे,टिनाचे आ.सी.सी) निवासी घर,अनिवासी घर,अंडर कंन्स्ट्रक्शन,सामाजिक कल्यानकारी संस्थेचा उपक्रम इमारत तसेच प्रती चौरस मिटर दर याबाबत सर्वे करून नोंद घेणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीने घर मालकाला मालमत्तेच्या वस्तुस्थिती बाबत कुठलीही विचारणा केली नाही. म्हणुनच मालमत्तेची वस्तुस्थिती दर्शक मांडणी कंत्रारदार कंपनीच्या प्रतिनिधीने न घेता मनमानी पद्धतीने नोंदी केल्या. परिणामी मागील किंवा लगतच्या वर्षीच्या कर रक्कमेच्या तुलनेत साधारणतः 15 ते 20 पटीत रक्कमेत वाढ करणे ही खऱ्या अर्थाने आर्थिक पिळवणुकच आहे. या सर्व बाबी अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपिठ या संघटनेने कायदेशीर पणे मांडल्या व संघटनेच्या मागण्या विचारात घेवुन मुख्याधिकारी श्री केदारे यांच्या कडून तात्काळ मान्यता देण्यात आली व आक्षेप मुदत वाढीसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे.तसेच नगराध्यक्ष आतेकुर रहेमान जवारी यांनीही मलकापूर शहरातील मालमत्ता धारकांवर अन्याय होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतो आणि गरज पडल्यास कंत्रातदार कंपनीच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)