विषय : रेल्वे स्टेशन मलकापूर जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील कृषी उत्पन्न बाजार समितीची 50 गुंठे जागा मिळणे बाबत.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


सभापती 

कृषी उत्पन्न बाजार समिती 

मलकापूर जिल्हा बुलढाणा 

अर्जदार : कुणाल सुधीरराव सावळे 

              रा. मलकापूर 443101

              जिल्हा बुलढाणा


मा.महोदय,

गेल्या 92 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूरच्या ताब्यात असलेली शासनाची 5 एकर 14 गुंठे जमीन अखेर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रेन मार्केट मलकापूर या नावाने नोंद झाल्याने व बाजार समितीच्या मालकीचे मालमत्ता पत्रक ( आखीव पत्रिका) सुद्धा तयार झाल्याने आता गेल्या 92 वर्षापासून शासनाचा हा अवाढव्य 5 एकर 14 गुंठे एकरचा भूखंड पूर्णपणे बाजार समितीच्या आज रोजी ताब्यात आहे. 

उपरोक्त विषयास अनुसरून दिनांक 12 /10/ 2022 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी महसूल मलकापूर यांच्याकडे सर्व भीमसैनिकांनी संयुक्तिक सहीचे निवेदन देऊन मलकापूर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा बौद्ध समाजाच्या धार्मिक, सामाजिक व मंगल कार्यालयास देण्याची विनंती केली होती. 

तरीही सदर भूखंड आज रोजी पूर्णपणे बाजार समितीच्या ताब्यात असल्यामुळे सदर विषयावर आज रोजी पूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार कृषी उत्पन्न बाजार समिती शासन व प्रशासनाचा आहे व तसेच महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशाबद्दलचे असलेले योगदान व सर्व भीमसैनिकांच्या भावनांचा आदर करता आपण सदरच्या भूखंडामधून निदान कमीत कमी 50 गुंठे जागा बौद्ध समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक तसेच मंगल कार्यालयासाठी देण्याची कृपा करावी. 

गेल्या 12 /10 /2022 पासून सर्व भीमसैनिक वरील मागणीचा रात्रंदिवस पाठपुरावा करीत आहे म्हणून सर्व भीमसैनिकांच्या व बौद्ध समाजाच्या भावनांचा आदर करून आपण वरील विषयात योग्य तो निर्णय घ्याल ही अपेक्षा.

दिनांक: 17 / 02 / 2026


                         आपला विश्वासू 

                

               कुणाल सुधीरराव सावळे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)