मलकापूर (प्रतिनिधी):
लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ संचलित *पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे* येथे ‘रिलिश २के२६’ हा भव्य सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात २१ फेब्रुवारी ला पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ज्ञानदेवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात अनुभवली.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मा. राजेशजी पंडितराव एकडे तसेच अमरावती विद्यापीठाचे चे सिनेट सदस्य मा. राजेशजी पांडे सर उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून बेंझो केम इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक मा. प्रल्हादजी झोपे तसेच चैतन्य बायो-केमिकल्सचे व्यवस्थापक मा. सुधीरजी तापी यांनी हजेरी लावली. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा. ज्ञानदेव पाटील, सचिव मा. डॉ. अरविंद कोलते, कोषाध्यक्ष मा. सुधीर पाचपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी तसेच पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य प्रा. संदीप खाचणे, प्राध्यापिका संगीता खर्चे उपस्थित होते. सर्व विभागप्रमुख प्रा. नितीन खर्चे, डॉ. अमोघ मालोकार, प्रा. सुदेश फरपट, प्रा. संतोष शेकोकार, प्रा. योगेश सुशीर, प्रा. गजानन सुपे, प्रा. साकेत पाटील, प्रा. महेश शास्त्री, प्रा. जयप्रकाश सोनोने उपस्थित होते. ‘रिलिश २के२६’ अंतर्गत दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी नृत्य, गायन, नाटक आणि वाद्यवादन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक तसेच आधुनिक कलाप्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास मा. संतोषभाऊ रायपुरे , मा. हाजी रशीद खान , मा. ॲड. जी. डब्ल्यू. सोमन, डॉ. जयश्री खर्चे, श्री. बंडूभाऊ चौधरी, उमाकांत चौधरी, अमित झनके, निलेश पाटील, गजानन झनके आदी मान्यवरांचीही विशेष उपस्थिती लाभली, यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनयकौशल्याचे परीक्षण केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विविध स्पर्धांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडी घ्यावी, असे आवाहन केले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम संयोजक प्रा. नितीन भारंबे व प्रा. राजेश टाकळकर, मुख्य विद्यार्थी समन्वयक अश्विन लोखंडे, धनंजय वाघ, प्रणव बढे, भार्गव नगरे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. ‘रिलिश २के२६’ हा सांस्कृतिक सोहळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवे व्यासपीठ देणारा ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.

