मका खरेदी तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



मलकापूर : शेतकरी हितास्तव मका खरेदी केंद्रांचे टार्गेट वाढवून तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी बुलढाणा यांचकडे आज ४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार मलकापूर यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

              सध्या सुरू असलेली शासकीय मका खरेदी अचानक बंद झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. प्रत्येक खरेदी केंद्रावर सुमारे १००० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असतांना प्रत्यक्षात केवळ २०० शेतकऱ्यांचाच मका मोजणीस आला आहे. उर्वरित शेतकरी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असून टार्गेट संपल्याचे कारण पुढे करून खरेदी थांबवण्यात आली आहे.

शासनाने मका पिकाला प्रति क्विंटल २४०० रुपये हमीभाव जाहीर केला असताना बाजारात मात्र मका अवघ्या १५०० रुपयांना विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे ९०० रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

                 मका खरेदी केंद्रांचे टार्गेट तातडीने वाढवून शासकीय दराने खरेदी सुरू न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्यासह श्रीकृष्ण म्हैसागर, विशाल मोरे, प्रमोद सपकाळ, सुरेश सपकाळ, सुनील भोकरे, शरद लांडे, किरण मालठाणे, राम मालठाणे, अंबादास म्हैसागर, माणिकराव म्हैसागर, भास्कर मालठाणे, गजानन मालठाणे यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)