इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात भूगोल प्रश्न मंजुषा परीक्षेचे आयोजन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


जळगाव: 09/03. इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची माहिती व अभिरुची अधिकाधिक वाढावी याकरिता महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांकरिता “जिओ जेम” भूगोल प्रश्न मंजुषा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. बहु पर्यायी परीक्षेत 36 महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

  परीक्षेत प्रथम क्रमांक महाविद्यालयातील उम्मे राहत बाबू खटीक (द्वितीय वर्ष कला); तर  शेख बुशरा नाज़ मुनाफ (द्वितीय वर्ष विज्ञान) आणि मिसबाह नाज़ मुनीर अहमद (द्वितीय वर्ष कला) यांना द्वितीय क्रमांक विभागून मिळाले. तृतीय क्रमांकावर आयशा अजीमोद्दीन शेख (प्रथम वर्ष विज्ञान) ही होती.

परीक्षेच्या आयोजना करीता डॉ. इरफान शेख, भूगोल विभाग प्रमुख, डॉ. अमीनुद्दिन काज़ी यांनी परिश्रम घेतले. परिक्षेचे समन्वयक म्हणून डॉ. राजू गवरे यांनी काम पाहिले. परिक्षेच्या यशस्वी आयोजना करिता महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य डॉ. वकार शेख, उप-प्राचार्य डॉ. तन्वीर खान, डॉ. हाफ़िज़ शेख़ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)