१५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत काढण्यात आलेले निविदा रद्द करणे बाबत.. अर्जदाराचे नांव :- जुनेद खान मुनसफखान पठाण अडावद (ग्रामपंचायत सदस्य अडावद)

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 प्रति,

मा. गट विकास अधिकारी सो 

पंचायत समिती चोपडा

ता. चोपडा जि. जळगाव

दिनांक :-      /      /२०२६



विषय            

महाशय,  मी वरील विश्यान्वे विनंती करतो कि १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत अडावद गावात दिनांक ०५/०३/२०२६ व दि. ११/०३/२०२६ रोजी जे निविदा (इ टेंडर) काढण्यात आले आहेत. 

ते मा. ग्रा.पं अधिकारी व सरपंच यांनी संगनमत करून काढले आहे. मी ग्रा सदस्य म्हणून तसेच इतर सदस्यांना देखील यांनी विश्वासात घेतले नाही. अथवा मासिक मिटिंग मध्ये कामाबात असा कोणताही ठराव केलेला नाही. पूर्ण पणे मनमानी कारभार या ठिकाणी चालत आहे. असे बहुतेक कामांना विरोद असून देखील कामांचे बिल काढण्यात येतात तसेच  एकाच ठेकेदारांना इ टेंडर देण्यात येते. गावात होणारे कामे अतिशय कनिष्ट (खराब) दर्जाचे होतात. त्या बाबत तक्रार केली तर ग्रा.पं अधिकारी व  सरपंच हे धमकी देतात कि तुला जे करायचे ते कर आमच कोणी काही बिगाडू शकत नाही. शासनाच्या निधीच्या गैर वापर होत आहे. 

मी ग्रा. पं सदस्य म्हणून आपणास विनंती करतो कि आपण वरील दिनांक प्रमाणे जे निविदा (इ टेंडर) काढण्यात आले आहे ते रद्द करावे. व तसेच या आधी १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत करण्यात आलेले कामांची देखील सखोल चौकशी व्हावी व त्या नंतरच त्यांची बिले काढण्यात यावी. कारण मोठ्याप्रमाणात कामांमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे. आपल्या स्थरावरून लवकरात लवकर चौकशी व्हावी. 

या आधी देखील मी १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत चौकशी संघर्भात सी.एम पोर्टला देखील तक्रार केले आहे. परंतु आपल्या स्थरावरून कोणतीही चौकशी होत नाही व झाली नाही  उलट त्या बाबत विचारणा केली असता मा. आर टी सैंदाणे विस्तार अधिकारी हे आम्हाला उळ्वाउळवीचे उत्तर देतात ते मला विचारतात कि असल्या चौकशीने काही होत नाही. तुम्ही कितीही तक्रार केली कोणतीही चौकशी होणार नाही या मी विनंती करतो कि या  वेळेस असा कोणताही प्रकार होऊ नये पूर्ण पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी  अन्यता मी आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसेल.


सोबत 

१) निविदा ( इ टेंडर ) छायांकित प्रत 

२) सी.एम पोर्टल चौकशी आदेश 

                                                                                                        अर्जदार

                                                                                           जुनेद खान मुनसफखान पठाण

                                                                                                ( ग्रामपंचायत सदस्य)

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)