शेतात राहणारे शेतकऱ्यांना सुद्धा 24 तास सिंगल फेज लाईन द्या -संभाजी शिर्के यांची मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



 दाताळा एमएसईबी अंतर्गत येणाऱ्या वरखेड सावडी भाडगणी लासुरा शिवारातील शेतकऱ्यांना 24 तास सिंगल फेज लाईन पुरवठा करण्याबाबतचे निवेदन आज कार्यकारी अभियंता मलकापूर श्री तायडे साहेब यांना सादर करण्यात आले. देण्यात आलेल्या निवेदनात असे लिहिण्यात आले आहे की गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संध्याकाळी सहा ते दहा च्या दरम्यान शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा सिंगल फेज पुरवठा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शेतात राहणारे शेतकऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. तसेच या शिवारामध्ये बिबट्याचा वावर अधिक प्रमाणात वाढलेला असून जनावरांच्या तसेच लहान लेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. तसेच यादरम्यान हा परीक्षेचा काळ असून संध्याकाळी अभ्यासाची वेळ असल्यामुळे  मुलांच्या भवितव्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. गावामध्ये शहरांमध्ये  राहणारा माणूस माणूस असेल तर शेतामध्ये राहणारा शेतकरी सुद्धा माणूसच आहे. याचा विचार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने करणे अत्यंत गरजेचे आहे.

 या दिलेल्या निवेदनावर जर तात्काळ कारवाई करून यावर निर्णय महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने घेतलं नाही तर याशिवारातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संभाजी शिर्के यांनी दिला आहे . निवेदन देतेवेळी खालील शेतकरी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)