पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालया मधील विद्युत अभियांत्रिकी विभागाची औद्योगिक भेट उत्साहात संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 




मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी औद्योगिक भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. या औद्योगिक भेटीअंतर्गत विद्यार्थ्यांनी कुर्‍हा येथील श्री लक्ष्मी इलेक्ट्रिकल मोटर रिवाइंडिंग वर्कशॉप तसेच भोटा (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील १३२/११ के.व्ही. सबस्टेशन येथे भेट दिली.


वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विद्युत मोटर्सचे बांधकाम, बिघाड शोधण्याच्या पद्धती तसेच मोटर रिवाइंडिंगची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. तांत्रिक कौशल्य, अचूकता आणि अनुभव यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. तसेच सबस्टेशन भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वीज निर्मितीपासून वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, ट्रान्सफॉर्मरचे कार्य, स्विचगियर, सर्किट ब्रेकर्स तसेच सुरक्षा उपाययोजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली. सबस्टेशनमधील प्रत्यक्ष उपकरणे पाहून विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान अधिक स्पष्ट झाले.


या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्याची वाढ होऊन उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची जाणीव निर्माण झाली. तसेच सुरक्षितता, देखभाल आणि शिस्त यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांनी आत्मसात केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


या भेटीस प्रा. अमोल हळदे, प्रा. पवन ठाकरे तसेच लॅब सहाय्यक मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भेट यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. युगेश खर्चे, अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. योगेश सुशीर तसेच पॉलिटेक्निक विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे या उपयुक्त, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी औद्योगिक भेटीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे सदस्य श्री. देवेंद्र  पाटील, श्री. पराग पाटील व डॉ. गौरव कोलते यांनी यावेळी केले .

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)