प्रतिनिधी
स्वाभिमानी शिव संदेश
नांदुरा नगरपरिषदेवर आज सोमवारी समाजवादी पक्षाच्या वतीने जन आक्रोश आंघोळ आंदोलन नांदुरा नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आझाद पठाण व त्यांचे सहकारी यापूर्वी नांदुरा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे आंदोलनाचे आयोजन केले होते त्यानुसार नांदुरा शहरातील सर्वात मोठी मुस्लिम वस्ती हे गेल्या ती चाळीस वर्षापासून मोठ्या प्रमाणात रहिवासी करीत आहे नांदुरा नगर परिषदेचे खोट्या प्रमाणात कर वसूल करण्यात येतो परंतु गैबी नगर भागात नांदुराने कोणतेही प्रकारच्या मूलभूत सुख सोयी तसेच नगरपरिषदेने पिण्याचे पाणी आतापर्यंत उपलब्ध केलेले नाही शहरात इतर भागात मोठ्या प्रमाणात नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी दिल्या जाते परंतु शहरातील सर्वात मोठी मुस्लिम वस्ती असलेल्या गैबिनगर भागात शहर नगर परिषदेच्या नवनियुक्त नगरसेवक नियुक्त नगराध्यक्ष नगरपालिकेचे अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे हा परिसर विकासापासून वंचित राहिलेला आहे
नांदुरा शहरातील समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे युवा नेते आझाद पठाण व त्यांचे सहकारी यांनी या परिसरात नगरपरिषदेने नागरिकांना पाणीपुरवठा योजनेचे पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठी वारंवार निवेदन दिलेले आहे परंतु अद्याप पर्यंत पाणी उपलब्ध नाही केल्यामुळे यांनी दिनांक 11 5 2026 सोमवारी जनआंदोलन जन आक्रोश आंघोळ आंदोलन आयोजित केले त्यानुसार सोमवारी अकरा वाजता नांदुरा नगरपरिषद कार्यालयात कार्यकर्त्यांसह येऊन आंघोळ आंदोलन केले यावेळी नांदुरा नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी व मुख्याधिकारी गैरहजर होते मोर्चेकरांना समोर जाण्यासाठी कुठलाही मोठा अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते नांदुरा पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता नारखेडे व इतर कर्मचारी मोर्चेकरांना समोर जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले व त्यांना आश्वासन दिले यावेळी नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री कैलास चौधरी साहेब व श्री इंगळे श्री संजय वराडे. गोपनीय विभागाचे श्रीधर काळे . पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चाचा बंदोबस्त केला त्यावेळी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हजर होते


