पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांची जयंती उत्साहात साजरी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दिनांक २२ जून २०२६ रोजी पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका प्रा. अनिता पाटील यांनी पद्मश्री डॉ. कोलते यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून दिला. त्यांनी डॉ. कोलते यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक योगदान, मराठी साहित्य क्षेत्रातील भरीव कार्य तसेच त्यांच्या कविता, ग्रंथसंपदा आणि संशोधनपर लेखनाविषयी उपस्थितांना माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी आपल्या मनोगतात डॉ. कोलते यांनी महानुभाव पंथावरील साहित्य व संशोधन क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. त्यांच्या वैचारिक समृद्धी, संशोधनवृत्ती आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष मा. डी. एन. पाटील यांनी पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी डॉ. कोलते यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास प्रशासकीय डीन प्रा. युगेश खर्चे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले, प्रा. नितीन खर्चे, प्रा मधुकर टेकाडे, प्रा दीपक खरात,प्रा. कैलास कोळी, श्री. रमाकांत राणे, प्रा. राजेश सरोदे, प्रा. मनोज वानखेडे, प्रा. प्रगती चौधरी, प्रा. शुभांगी निवाने, प्रा. शितल इंगळे, प्रा. चैताली नारखेडे, प्रा. पुनम खर्चे, प्रा. श्रद्धा लांडे, प्रा. सुरेखा इखारे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते. पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाज व शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)