प्रतिनिधी, मलकापूर:
अभियांत्रिकी बी. ई. प्रथम वर्ष प्रवेशाचे बिगुल वाजताच स्थानिक 'पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मध्ये विद्यार्थ्यां आणि पालकांचा महापूर आला असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शासनमान्य सुविधा केंद्र असलेल्या या महाविद्यालयात पहिल्याच दिवसापासून ऑनलाईन नोंदणी आणि दस्तऐवज पडताळणीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. कॉलेजच्या आवारात जणू काही शैक्षणिक जत्राच भरल्याचे चित्र निर्माण झाले असून भविष्य घडवण्यासाठी आतुर झालेले हजारो विद्यार्थी आणि आपल्या पाल्याच्या सुरक्षित करिअरसाठी चिंतेत असलेले पालक पहाटेपासूनच महाविद्यालयाच्या दारात रांगा लावून उभे आहेत. महाविद्यालयाचे तज्ज्ञ प्रत्येक विद्यार्थ्याला फॉर्म भरण्यापासून ते कागदपत्रांच्या पडताळणीपर्यंत अत्यंत बारकाईने आणि आपुलकीने मदत करत आहेत. तांत्रिक अडचणी आणि नियमांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पालकांना हे प्राध्यापक अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करत असल्याने पालकांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे सावट दूर होताना दिसत आहे.
या संपूर्ण भव्य प्रक्रियेचे नियोजन आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या थेट देखरेखीखाली सुरू असून एकही विद्यार्थी मार्गदर्शनाअभावी वंचित राहता कामा नये आणि कोणाचाही फॉर्म चुकता कामा नये. त्यांना या कार्यात उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे यांनी संपूर्ण रांगांचे नियोजन, तांत्रिक कक्षाची व्यवस्था आणि पालकांच्या बसण्याची उत्तम सोय करून घेतली असल्याने कुठेही गोंधळ न उडता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या संपूर्ण यशस्वी आयोजनामागे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव पाटील यांची दूरदृष्टी आणि खंबीर प्रेरणा काम करत असून 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण अत्यंत सुलभतेने मिळावे,' हा त्यांचा मानस या गर्दीच्या आणि मदतीच्या वातावरणातून स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया २ जुलै २०२६ ते १२ जुलै २०२६ सुरू राहणार असून, आलेल्या अर्जांची कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती करण्याची मुदत ३ जुलै २०२६ ते १३ जुलै २०२६ अशी आहे, तर १५ जुलै २०२६ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी आणि २० जुलै २०२६ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक केवळ कागदपत्रांची तपासणी करत नसून, विद्यार्थ्यांना कोणत्या शाखेत प्रवेश घेतल्यास भविष्यात काय संधी मिळतील, याचे उत्तम करिअर समुपदेशन देखील करत आहेत. 'कोलते कॉलेज'ने निर्माण केलेली ही हेल्पडेस्क व्यवस्था सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून, 'प्रवेशाचा महामार्ग म्हणजे कोलते कॉलेज' अशीच चर्चा आता पालकांमध्ये रंगू लागली आहे, तसेच या प्रवेश प्रक्रिये संदर्भात, आवश्यक कागदपत्रांबद्दल किंवा इतर कोणत्याही अडचणींबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी थेट ८९८९२२९८९८ या अधिकृत संपर्क क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

