खामगांव येथील आक्रोश मोर्चात मलकापूर मतदार संघातील शेतकरी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे..

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
.आ.सिद्धार्थ खरात मलकापुर:-कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत तातडीने द्या या इतर मागण्यांसाठी खामगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा संदर्भात मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर व मेहकर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.दि.30 सप्टेंबर बुधवार ला अप्पर जिल्हाधिकारी खामगाव कार्यालयावर बुलढाणा जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करा व शेतकऱ्यांच्या ईतर सर्व मागण्यांसाठी शिवसेना उपनेते आमदार नितीन बापू देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा चे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने मलकापूर विधानसभा मतदारसंघ तील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शिवसेना सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने यांच्या संपर्क कार्यालयात दि.23  सप्टेंबर 26 रोजी सायंकाळी 5 वाजता बैठक घेऊन मार्गदर्शन केले व मोर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, दिपक चांभारे तालुका प्रमुख मलकापूर, हरिदास गणबास शहर प्रमुख मलकापूर, ईश्वर पांडव नांदुरा तालुका प्रमुख, विष्णू धोरण ऊप तालुका प्रमुख, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसिम सै.रहीम, यावेळी बाळु ठाकरे यांनी शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला आ.सिद्धार्थ खरात यांनी भगवा दुप्पटा घालून त्यांचा सत्कार केला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)