सासरी आलेल्या जवायाचा धरणात बुडुन मृत्यूधा. बढे पोलीस ठाण्या अंतर्गत घटनाधामणगाव बढे सादिक शेख ✍️

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

-----------------------------------------
 तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळगाव देवी येथे आपल्या सासरी आलेल्या वडरसीम तालुका भुसावळ येथील नामदेव सदाशिव जाधव वय 40 वर्ष व्यक्तींचा धरणात बुडुन मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडीस आली. सदरच्या घटनेची महिती मिळताच धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे बिट जमादार मधुकर महाजन, सुरज रोकडे, नितीन इंगळे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे पाठवले.
               या बाबत सविस्तर वृत्त असे की नामदेव सदाशिव जाधव वय 40 वर्ष राहणार वडरसीम तालुका भुसावळ हा आपली सारवाडी असलेल्या पिंपळगाव देवी येथे पाव्हना म्हणून काही दिवसांपूर्वी आला होता. दरम्यान नामदेव सदाशिव जाधव हा शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळगाव बिट मधील गोरणाला पाझर तलाव येथे मासे पकडण्यासाठी जातो असे सांगुन घरून गेला होता. दरम्यान संध्याकाळी उशिरा पर्यत नामदेव सदाशिव जाधव घरी न आल्याने आज शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी मृतक नामदेव सदाशिव जाधव याचा साला संतोष दांडगे याने मृतक नामदेव जाधव यांच्या शोध घेतला असता. धरण परिसरात मृतकांचे कपडे व अन्य साहित्य दिसुन आल्याने त्यांच्या शोध घेतला असता पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळुन आला. सदरचे वृत्त लिहे पर्यत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)