* 18 नोव्हेंबर रोजी क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अलफैज फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुल अजीज सालार, अलफैज उर्दू हायस्कूलचे चेअरमन मुश्ताक सालार, अब्दुल वहाब मलिक, खूबचंद सागरमल विद्यालयचे प्रवीण पाटील सर, रशीद खान, रुकैय्या कुरैशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा ही अनन्यसाधारण भूमिका पार पाडत असते विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासोबत शारीरिक विकास हे सुद्धा गरजेचे असते त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यात मदत होते शाळेचे चेअरमन माननीय मुस्ताक सालार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली शाळेचे मुख्याध्यापक पठाण आसिफ खान यांनी क्रीडा स्पर्धेचे महत्त्व सांगितले. अ. वहाब मलिक यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख नवाब यांनी केले तर आभार जाहीद खान यांनी मानले अशा वेळी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख पिंजारी असीम, शेख तोफिक, शेख वकार, जुबैर खान, आयशा खान, मुनव्वर सुलताना, शाहीन कुरेशी, जमील खान, खिजर खान, शेख रिजवान, अजहर खान, अकीला शेख यांनी मेहनत घेतली.
