महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी घोषित.*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
*प्रेस नोट :-*
*""""""""""""""""*

*
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

        महाराष्ट्र कलावंत समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहीर प्रेमसागर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मौजे डोंगरखंडाळा,ता.जि.बुलडाणा येथे बुलडाणा जिल्ह्यातील कलावंतांची व साहित्यिकांची बैठक संपन्न झाली.
        सदरहू संपन्न झालेल्या बैठकीमधे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहीर प्रेमसागर कांबळे यांनी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करुन सदर जिल्हा कार्यकारिणी बैठकीमधे रितसर जाहीररित्या घोषित केली.
         घोषित केलेल्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष एस.के.जाधवसर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक सावळे महाराज, भगवान मेंढे मुर्तीकार, नागोराव सावळे, साहेबराव अंभोरे सर, कार्याध्यक्ष काशिनाथ फुलमाळी,
महासचिव संजय निकाळजे,सहसचिव श्रीमती गोदावरीताई सावळे,सौ.प्रिती शेगोकार,सौ.लक्ष्मी मोरे, भाऊराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्रमोद दांडगे,संघटक रामदास मलवार तर सहसंघटक म्हणून कल्पना खंडेराव व कविता सोनोने यांचा समावेश आहे.
          नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीतील सर्वच पदाधिका-यांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहीर प्रेमसागर कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.बैठकीचे सूत्रसंचालन दिपक सावळे महाराज यांनी केले.सदरहू बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातील बहुसंख्य कलावंतांची व साहित्यिकांची उपस्थिती होती.

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
      *कृपया आपल्या स्तरावर उपरोक्त बातमी बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच वृर्तपत्रांत देऊन संघटनेला सहकार्य करावे, हि नम्र विनंती आहे.*

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)