विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव चा क्रिकेटचा संघ पहिल्या सामन्यात विजयी झालेला आहे. आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी मू.जे. महाविद्यालय जळगाव च्या मैदानात या स्पर्धा झाल्या. त्यात नूतन मराठा विरुद्ध ईकरा महाविद्यालय असा सामना झाला. त्यात पंधरा ओवर्स मध्ये नूतन मराठा महाविद्यालयाने 106 धावा बनवले. त्यानंतर ईकराच्या संघाने 15 ओव्हरस् खेळून 108 धावा बनवून विजयश्री खेचून आणला . तवकिर रजा, अदनान बागवान, अहेतेशाम, अवेस, अतिक, जबी, या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. व विजय संपादन केला.त्यांच्या या यशा बद्दल इकरा शिक्षणं संस्थे चे अध्यक्ष मा. डॉ अब्दुल करीम सालार, चेअरमन डॉ इकबाल शाह, सचिव एजाज अब्दुल गफार मलिक, तसेच प्राचार्य प्रा आय एम पिंजारी यांनी खेळाडू चे अभिनंदन केले आहे.महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा. डॉ. चांद खान सफदर खान यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
