मुक्ताईनगर सिड फार्म येथील रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय च्या वतीने हजरत टिपु सुलतान जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय चे अध्यक्ष हकिम आर चौधरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड अखलाक शाह व वाचनालय चे सह सचिव रफिक हाजी मजीद हे होते. त्यावेळी हजरत टिपु सुलतान यांचे जीवनावर प्रकाश टाकण्यात आले. त्याचे एक वाक्य खुप प्रसिद्ध आहे "गिदड की सौ साल की जिन्दगी जीने से शेर की एक दीन की जिन्दगी बेहतर है. असे त्याचे विचार होते. त्याना शेरे महसुर हजरत टिपु सुलतान(र.ह) अशा नावाने संबोधले जायचे ते एक उत्कृष्ट योध्दा दुर दुष्टी असणारे राजे होते. सर्वात पहिली तौफ चे निर्माण करणारे "मिसाईलमॅन" स्वतंत्र सेनानी हजरत टिपु सुलतान(र.ह) यांची 272 वी जयंती निमित्त तसेच अंग्रेज आपल्या देशाचे वास्तविक शत्रु आहेत. या देशातून बाहेर काढण्यासाठी संपुर्ण हिन्दुस्तानातील लोकांना एकत्र आणुन लोक आंदोलन उभारणारे असे महान देशभक्त हजरत टिपु सुलतान यांची जयंती निमित्त त्याचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हकिम आर चौधरी, अॅड. अखलाक शाह, रफिक मजीद, आदिने पुष्पहार अर्पण केले.
सदरच्या कार्यक्रमाचे रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय मुक्ताईनगर चे जावेद मनियार, शेख फिरोज, शेख महेबूब मनियार, कलीम मनियार, शेख सलीम शेख फेजु, शेख आबिद शेख आरीफ, शेख बिलाल शेख समद आदि समाज बांधव उपस्थित होते.
