विद्यमाने संविधान दिनानिमित्त नागरिकांचे मुलभूत हक्क या विषयावर मार्गदर्शन व प्रश्नमंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश पी.आर.कदम हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तदर्थ जिल्हा न्यायाधिश एस.व्ही.जाधव, दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर ए.जी.देशींगकर, दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर एस.एम.अहेर तथा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.ग.वा.सोमण व महाविद्यालयाचे सचिव प्रशांत खर्चे, महाविद्यालयाचे प्राचार्य दिक्षीत सर हे मंचकावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ.अमर तायडे हे होते. त्यांनी नागरिकांचे मुलभूत हक्क या विषयावर तथा संविधान निर्मिती विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर सदर ठिकाणी भारतीय राज्य घटनेवर आधारीत प्रश्नमंजूषा या कार्यक्रमाचे मलकापूर वकील संघातर्पेâ आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये समाजकार्य महाविद्यालयाचे २१ विद्यार्थ्यांनी तीन गटामध्ये सहभाग नोंदविला. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन क्रमांक घोषित करण्यात येवून त्यांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वकील संघाचे सदस्य अॅड.दर्शना दिवे, अॅड.रितू संचेती, अॅड.स्वाती पाटील, अॅड.गरिमा संचेती, अॅड.जी.डी. पाटील, अॅड.नितीन जाधव, अॅड.विवेक बापट, उदय कपले यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये न्यायाधिश पी.आर.कदम यांनी भारतीय राज्य घटनेचे भारताच्या लोकशाहीमध्ये असलेले योगदान अधोरेखीत करून भारतीय संविधानामुळेच आज भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे, असे प्रतिपादन केले. तसेच भारतीय संविधान निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या कार्यास शेवटी त्यांनी नमन केले.
कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तथा न्यायालयीन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
