वीज अभियंत्याला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


खामगाव

वीज मारहाण अभियंत्याला केल्याप्रकरणी पिंप्राळा येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोलरी सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता कुणाल ठाकरे यांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली की, १६ जून रोजी पिंप्राळा येथे एका इसमाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती कळताच ते काही कर्मचाऱ्यांना घेवून पिंप्राळा येथे गेले असता काही जणांनी त्यांना व त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या तक्रारीवरुन पोलिसांनी कैलास पाचपोर, गोविंदा दत्तात्रय शेजोळे, दौलत दयाराम पेसोडे व संतोष यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३३२, ५०४,३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)