अकोला रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचीअतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे अजनी- पुणे- अजनीसह विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर- मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष १ जुलैपर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित होते आता ३० सप्टेंबरपर्यंत विस्तारित केली. मडगाव-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष २ जुलैपर्यंत चालविण्यात येणार होती. सदर गाडी १ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
दादर- बलिया दादर त्रि - साप्ताहिक विशेष, दादर- गोरखपूर-दादर, सोलापूर- मुंबई, सोलापूर- तिरुपती, लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्हारशाह लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष अधिसूचित होती. आता २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. पुणे- अमरावती विशेष गाडी आता ३० जुलैपर्यंत आहे. तसेच अजनी- पुणे विशेष एक्सप्रेस २९ जुलैपर्यंत धावेल..

.jpg)