ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


                                नांदुरा रस्त्यावरील एका पेट्रोलपंपानजीक : मृताची आई जखमी

खामगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना खामगाव नांदुरा रस्त्यावरील एका पेट्रोलपंपानजीक शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील मूर्ती येथील पवन महादेव सपकाळआणि त्याची आई शनिवारी दुपारी दुचाकीने नांदुराकडे जात होती. दरम्यान, पारखेड शिवारात पाठीमागून येत असलेल्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार पवन आणि त्याची आई दूरवर फेकले गेले. त्यामुळे पवनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली.अपघातानंतर नागरिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या पवनच्या आईला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. या घटनेनंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)