कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा आणि तालुका कृषि अधिकारी बुलढाणा यांच्यातर्फे रानभाजी सप्ताहांतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन सोमवार, १४ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील कृषि विज्ञान केंद्रात करण्यात आले आहे. महोत्सवात विविध रानभाज्या प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच रानभाज्याची पाककृती विषद करण्यात येईल. महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड, अमरावती विभागाचे पालक कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने आवहान केले आहे.

.jpg)