प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
मलकापुर :- जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲप च्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सप्टेंबर महिन्यातील जिल्हा स्तरावरील 'पोस्ट ऑफ द मंथ' विजेते शिक्षक कु .रेखा साहेबराव सोळंके जि.प. कें. म. प्रा. शाळा हिवरखेड पंचायत समिती खामगाव, सौ. पुनम डाबेराव सोळंके जि.प. कें. म. प्रा. शाळा हिवरखेड पंचायत समिती खामगाव. श्री. किशोर भागवत जि.प. कें. म. प्रा. शाळा हिवरखेड पंचायत समिती खामगाव,श्री. प्रताप सिंग वसंतसिंग चव्हाण जि.प. म. प्रा. शाळा पोरज पंचायत समिती खामगाव, श्री. श्याम शेळके जि.प. म.ऊ.प्रा. शाळा पिंपरी माळी पंचायत समिती मेहकर, श्री. सारंदर जानुजी बांगर जि.प.कें.म.प्रा. शाळा वडशिंगी पंचायत समिती जळगाव जामोद, या सर्व शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब जिल्हा परिषद बुलढाणा यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विनोबा ॲप मध्ये उत्कृष्ट कार्य करून पुस्तकालय हँगिंग बॅग ज्या शिक्षकांनी मिळवली सौ. विद्या चावरे, श्री. सारंदर बांगर, श्री रामकिशन पिसे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या हस्ते पुस्तकालय हँगिंग बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. आणि विनोबांच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या महावाचन प्रोग्रामचे जिल्हास्तरीय विनर श्री. फकीरा राजगुरू यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सदरील पुरस्कार वितरणावेळी आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक शेख नजीर आणि अजय राठोड यांच्यासह अनेक अधिकारी गण उपस्थित होते.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब यांनी विजेते शिक्षकांसोबत त्यांच्या कार्यावर व नवीन नवीन उपक्रमावर चर्चा केली आणि सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
