जालना तो सिर्फ झाकी थी,मुंबई अभी बाकी है* *देवधाबा येथून दिपक बोऱ्हाडे यांचा थेट एल्गार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


मलकापूर प्रतिनिधी,, 

मलकापूर :- धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून,सरकारच्या उदासीन आणि फसव्या भूमिके विरोधात देवधाबा येथून थेट एल्गार करण्यात आला. सकल धनगर समाज मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित  देवधाबा येथे दीपक बोऱ्हाडे यांचा भव्य नागरी सत्कार व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तालुक्यातील मोठा जनसागर उसळला होता.

सभेच्या सुरुवातीला सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले.यानंतर मल्हार योद्धे दीपक बोऱ्हाडे यांचा जंगी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक बोऱ्हाडे यांनी आपल्या तडाखेबंद आणि आक्रमक भाषणातून सरकारला थेट इशारा देत धनगर समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असे स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले.

जालना ही फक्त झाकी होती. मुंबई अजून बाकी आहे. २१ जानेवारीला मुंबईत पिवळं वादळ उसळलं तर सरकारला चैन पडू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी या सभेतून दिला आहे.

वर्षानुवर्षे एसटी आरक्षणाच्या मागणीवर सरकारकडून फक्त आश्वासनांची खैरात वाटली जात असून, आता धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.हा लढा भीक मागण्याचा नाही,तर हक्क मिळवण्याचा आहे,असे ते म्हणाले.

सभास्थळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाजबांधवांनी एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे, धनगर समाजाचा विजय असो अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. युवक,महिला,ज्येष्ठ नागरिकांनी एकसंघ होत आंदोलन अधिक तीव्र, व्यापक आणि निर्णायक करण्याची शपथ घेतली.

या सभेमुळे धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाला प्रचंड उर्जा मिळाली असून, मुंबईतील महाआंदोलन सरकारसाठी निर्णायक ठरणार,असा स्पष्ट संदेश देवधाबा येथून देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा सुशिर यांनी केले तर प्रास्ताविक गणेश सुशिर तर आभार प्रदर्शन अनंता दिवनाले यांनी केले, आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश नेमाडे,दीपक बोरसे,शिवप्रसाद पासपोळ,यांनी अतोनात प्रयत्न केले.यावेळी सभेला देवधाबा गावकऱ्यांसह मलकापूर तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)