पारपेठ भागातील प्रभाग 9 ब मधील नवनियुक्त शिवसेना (उबाठा)नगरसेवक रफीकसेठ बर्तनवाले यांची लाडूतुला

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



 मलकापुर:- मलकापुर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पारपेठ भागातील प्रभाग क्रमांक 9 ब मधील नवनिर्वाचित शिवसेना (उबाठा)नगरसेवक रफीकभाई बर्तनवाले हे 897 ऐवढ्या प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्याबद्दल दि.3 जानेवारी रोजी दानिश शेख,डाॅ.शाकीर ग्रुप यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै.रहीम, युवा सेना शहरप्रमुख मंगेश सातव, युवा सेना शहर सचिव सागर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रफीकभाई बर्तनवाले यांचा लाडूतुला कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजित भव्य कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,शिवसेना  शहरप्रमुख हरीदास गणबास, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसिम सै.रहीम,युवा सेना शहर प्रमुख मंगेश सातव, युवा सेना शहर सचिव सागर पाटील,किशोर राऊत  उपस्थित सर्व पदाधिकारी यांचा नगरसेवक रफीकसेठ बर्तनवाले यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

हा सत्कार म्हणजे संघटनात्मक बांधिलकी, परस्पर सन्मान आणि जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याच्या राजकीय इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व जनसामान्यांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी केले यावेळी सत्तार मेंबर,करीम भाई,सै.रहीम,करीम भाई,सलीम ठेकेदार,शब्बीर भाई,याकूब खान,नाजिम नवाज़,अहमद भाई, मोहम्मद शोएब,मोहसिन भाई,साजिद भाई,सलमान खान, 

अबरार भाई, सागर भाई,वाहिद भाई, गुडडू भाई, शेख वसीम,नदीम खान,शेख खलील, स्पीक भाई,इमरान शेख,हमिद भाई, फिरोज भाई, 

पप्पू भाई,शेख नईम सह आदिंची उपस्थिती होती.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)