मलकापूर : अखंडीत ३० वर्षे देशसेवा करणारे, कारगिल युध्दात, चिन सोबतच्या गलवान खोर्‍यातील चकमकीत, ऑपरेशन डोकलाममध्ये प्रत्यक्ष सहभागी असणारे वरखेड ता.मलकापूर येथील सुभेदार दिनेश तायडे हे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


 आज सेवानिवृत्त झाले. अशा या वीर योध्द्याच्या स्वागतासाठी मलकापूर पंचक्रोशितील अनेक नागरीक एकत्र होत त्यांनी हा सोहळा त्यांचे स्वागत करीत साजरा केला. यावेळी सुभेदार तायडे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, श्रीसंत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यासह हुतात्मा स्मारक, परमवीर चक्र शहीद अब्दुल हमीद, शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकावर अभिवादन केले.

यावेळी रेल्वे स्टेशन ते साईनगर दरम्यान उघड्या जीपमधून दिनेश तायडे यांची रॅली काढत देशभक्तीपर गितांनी परिसर दणादणला. याप्रसंगी ठिकठिकाणी अनेकांनी त्यांचे स्वागत केले. यात जिजाऊ फिटनेस मॉर्निंग ग्रुप, न.प.च्या वतीने नगराध्यक्ष आतिकभाई जवारीवाले, छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळाच्या वतीने नगरसेवक दुर्गेश राजापुरे, राकाँ शहराध्यक्ष राजाभाऊ डोफे, पत्रकार नितीन पवार,  माजी नगरसेवक सुहास चवरे व मित्र मंडळ यांच्यासह अनेकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी साईनगर येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपा नेते शिवचंद्र तायडे, दाताळा माजी सरपंच हरीभाऊ देशमुख, कृउबास संचालक योगेश पाटील,  भाराकाँ नेते संभाजी शिर्वेâ, वाकोडी सरपंच शुभम काजळे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख दिपक चांभारे, वंचित तालुकाध्यक्ष अजय सावळे, पुरूषोत्तम तायडे गुरूजी,  बाळासाहेब तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवचंद्र तायडे यांनी सांगितले की, आमच्या परिवारातील दिनेश याने अविरत केलेली देशसेवा आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याने परिवारासह पंचक्रोशिचे नाव देशात, जगात पोहचविले असून त्याने आपला अनुभवाने तरूणांना घडवावे, असे आवाहन केले. तर संभाजी शिर्वेâ यांनी किसान व जवान यांच्या भरवशावर देश सुरू जवानासह त्यांच्या परिवाराचीही जी समर्पक वृत्ती असते त्याचे कौतुक होणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नामदेवसिंग राजपूत, मुरलीधर झनके, मोहम्मद शकील, उल्हासराव अढाव, वैâलास पाटील, नितीन नारखेडे, मोतीिंसग राजपूत, सुधीर दहिभाते, मुलचंद काकडे, शिवाजी गायकवाड व सैनिक अतुल देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.   



दिनेश तायडे यांनी प्रत्यक्ष लढाईत सहभाग घेतलाच, मात्र यासह त्यांनी संरक्षण मंत्रालय, सेना मुख्यालय येथेही सेवा बजावली. त्यांना दोन वेळा जागतिक स्तरावर भारतीय सेनेचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मानही प्राप्त झाला. तर आपल्या कार्यकाळात शौर्यपुर्ण व अतुलनीय सेवेसाठी या निष्ठावान सैनिकाला १५ शौर्यपदके व २ विदेशी सेवा पदके मिळाली आहेत. यात १ संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) च्या वतीने देण्यात येणार्‍या पदकाचा समावेश आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)