इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव,

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


राष्ट्रीय सेवा योजना  विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ते ०६ जानेवारी २०२६  दरम्यान जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक ०१ नशिराबाद येथे  करण्यात आले आहे. शिबिराच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मतदान जनजागृती मोहीम, स्वच्छता अभियान, साक्षरता मोहीम, पर्यावरण इ.विषयासंबंधी  रॅली काढण्यात आली.  रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरील विषयावर  घोषवाक्ये तयार केले. रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी संबंधीत विषयावर घोषना दिल्या.  रॅलीची सुरुवात जि.प. उर्दु कन्या शाळा नं.१पासून शाळेच्या  मुख्याध्यापिका श्रीमती मुबारक बेगम  व शाळा समन्वयक शेख मसुद यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. नशिराबाद गावातील  प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि  मोहल्ल्यातून परत जि.प. उर्दु कन्या शाळा नं.१येथे रॅली ची सांगता करण्यात आली.

  रॅलीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी  डॉ.तनवीर खान  डॉ.सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफिज  डॉ.  शबाना खाटिक,बाबा पटेल तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.  शिबीराच्या  दुस-या सत्रात श्री.उमेश पाटील यांचे व्याख्यान मियॉंवाकी कुलपती धनवन योजना या विषयावर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी    रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. तनवीर खान, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफीज आणि डॉ.शबाना खाटिक हे उपस्थित होते. कार्यक्रम  यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)