तालुका कृषी कार्यालय नांदुरा येथे पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

   


तालुका प्रतिनिधी नांदुरा= नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा महसूल मंडळामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने उडीद मुंग ज्वारी सोयाबीन तूर कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने सोयाबीन एकरी  एक क्विंटल उत्पन्न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सन 2025 खरीप हंगाम पंतप्रधान पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा काढण्यासाठी  नांदुरा तालुका कृषी कार्यालयात चादुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले . तालुका पिक विमा प्रतिनिधी कुंदन सोळंकी यांनी लेखी पत्र देऊन पत्रामध्ये सन 2025 -26  खरीप हंगामातील पिक विमा चांदुर बिस्वा महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल या संदर्भात खरीप हंगाम 2025- 26 पिक विमा मंजूर करण्यात येईल पॉलिसी रिजेक्ट झालेल्या शेतकऱ्यांची अपुर्वल प्रक्रिया  वरिष्ठ स्तरावर  सुरू असून    असे पत्र अभय पाटील  देण्यात आले   शेतकऱ्यांनी आंदोलन  स्थगित केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)