इकरा शिक्षण संस्था जळगाव संचलित अब्दुल मजीद सालार इकरा उर्दू हायस्कूल बोरनार ता. जि. जळगाव येथील शाळेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मराठी भाषेचा गौरव, तिचे जतन व संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक श्री. आरीफ खान सर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी दिनाचे महत्त्व, २७ फेब्रुवारीचा ऐतिहासिक संदर्भ आणि महान साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिचा अभिमान बाळगणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल माहिती, भाषणे सादर केली. तसेच कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. मराठी कवितांचे सादरीकरण आणि विनोदी चुटकुल्यांमुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मराठी विभाग प्रमुख श्री. फिरोज खान सर यांनी प्रभावीपणे केले. अध्यक्षीय निवड श्री. शेख सादिक सर यांनी केली, तर त्यास अनुमोदन श्री. शेख अमीर सर यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. शेख जव्वाद सर यांनी उपस्थितांचे आभार मानून समारोप केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. मजहर खान सर, श्री. शेख रोशन सर, श्री. आबिद पिंजारी सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. आकिब सर (लिपिक), मुस्ताक भाई, युसुफ भाई व शब्बीर भाई यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार साहेब व इतर सभासदांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

