डॉ. ताहिर शेख यांना श्रद्धांजली, शोकसभेचे आयोजन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


जळगाव : इकरा एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ डॉ. ताहिर शेख यांचे दिनांक 11 मार्च 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मरणार्थ इकरा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य तसेच सर्व संस्थांचे प्रमुख आणि शिक्षक उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी डॉ. ताहिर शेख यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि समाजहिताच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण केली. ते अत्यंत प्रामाणिक, मृदुभाषी आणि समर्पित व्यक्तिमत्त्व होते. इकरा एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतीसाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संस्कारासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. ताहिर शेख यांनी कठीण परिस्थितीतही धैर्याने आणि चिकाटीने शैक्षणिक कार्य पुढे नेले आणि समाजात शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मण्यार समाजाच्या शैक्षणिक जागृतीसाठीही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

या शोकसभेत एजाज मलिक, प्रा. झफर शेख, अब्दुल रशीद शेख, मजीद सेठ झकरिया, अब्दुल अजीज सालार, गुलाम नबी दादा बागवान आणि तारिक अन्वर यांच्यासह विविध संस्थांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

शेवटी डॉ. अख्तर शाह यांच्या प्रार्थनेने शोकसभेची सांगता करण्यात आली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)