मलकापूर नगरपालीकेचा जलशुद्धीकरण केंद्र की घनकचरा डंपिंग ग्राउंड

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


वारंवार तक्रार करूनही मलकापूर नगरपालीकेच्या ढेपाळलेल्या भ्रष्ट आरोग्य अधिकाऱ्यांला जाग येत नसुन फोन उचलत नाही चित्रात दिसत असलेला कचरा ढीगाच्या

बाजुलाच अंगणवाडी,व समोर आदर्श प्राथमिक विद्यामंदिर ,लिलाधर भोजराज चांडक विद्यालय असुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची परवा न करता शासकीय पदाचा दुरुपयोग होत आहे काही दिवस अगोदर बस स्थानकाच्या आवारात मोठे अनर्थ टळले घनकचरा नियोजन

अभावी शहरातील अनेक भागात कचरा ढीग,नाल्या तुंबलेल्या अवस्थेत झालेल्या आहेत वरीष्ठ अधिकाऱ्यांचा अभयदान मिळण्याचे एकमेव कारण भ्रष्ट तंत्र असल्याची खमंग चर्चा करण्यात येत आहे मलकापूर शहराचे दुर्दैव कोट्यवधी रूपयांचे मलकापूर नगरपालीकेत होत असुन अंकेक्षण विभाग होत असलेल्या 

भ्रष्ट कारभारापासुन अनभिज्ञ का राहत आहेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यांचा विसर पडला आहे 

शहरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरूच आहे लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष का? निरंतर होत असलेला अन्याय कधी रौद्र रूप धारण करणार याची कल्पना अधिकाऱ्यांच्या लक्षात असावी

मेंदू ज्वर, डेंग्यू, मलेरिया,चिकन गुनीया,कोरोना, अश्या विविध नैसर्गिक आपत्तीत अनेक निष्पाप नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तरीही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी एकही अधिकारी पुढाकार का घेत नाही अश्या अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत ७६ वर्षांपासून आझाद झालेल्या 

देशाला प्रगती भ्रष्टाचारावर अंकुश लागल्याशिवाय पर्याय नाही म्हणून जनतेने आपल्या हक्कासाठी पुढाकार घ्यावा व 

दिरंगाई कारभारावर अंकुश लावावे 

डॉ सुभाष तलरेजा 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट 

जिल्हा संघटक 

मलकापूर

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)